Thursday, August 15, 2019

कुतूहल कोणी येण्याचं !

वडील ! बाबा ..
आपण किती मोठे झालो आहोत याची जाणीव आज झाली.
नेहमी बाबा म्हणून दुसऱ्या कोणाला हाक मारणारे आपन, स्वतः वडील होणार याची चाहूल लागताच, एक वेगळाच आनंद झाला होता !
काय होणार मुलगा की मुलगी हे महत्तवाचे नसले तरी कुतूहल मात्र आम्हा दोघांना बरेच होते.

अगदी नाव काय ठेवायचे आणि काय काय कपडे घायचे यावर आमच्या गप्पा रंगायच्या.
मी आपली काही जुनी नावे सुचवली, पण प्रमिला ( माझ्या होम मिनिस्टर) ला मॉर्डन नाव हवे होते..मग काय त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट सोपवले .
कुठेही लहान बाळ बघितले की आपले पण बाल असेच गोंडस असेल आणि आपण पण त्यासोबत असेच खेळत असू हेच स्वप्न मला पडायचे.

बाळ पोटात आहे तोपर्यंतच त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली होती.
आम्ही एक प्रार्थना रोज रात्री झोपताना म्हणायचो, ते एकले की ते जणू काही नाचुच लागे..
मला त्याचा खूप आनंद व्ह्याचा ! आता हे लीहताना प्रमिला माहेरी गेली आहे आणि त्याच्या बरोबर पोटात असतानाचे  क्षण खूप मिस करत आहे.

तशी जबाबदारी येणार याचे भान मला होतेच परंतु ती निभवण्याची तयारी मी चालू केली होतीच.
तिच्या  भावी आयुष्यात काही कमी पडू नये म्हणून कोणत्या कोणत्या गुंतवणूक करायचे हे आधीच ठरवून ठेवले होते.
हा ९ महिन्याच्या प्रवास जेवढा प्रमिला साठी खडतर होता तेवढा माझ्या साठी नसला तरी तिची सोबत देताना बराच आनंद होत होता.
डोहाळे जेवण आणि मेटरणीती फोटो शूट करायचे ही आम्ही ठरवले होते .
त्याच्या तयारीत ही बरच वेळ जात होता पण त्यातही एक मजा असते हे कळले होते.

वेळ जशी जशी जवळ येत होती तशी कुतूहल वाढत होते..देवाकडून पुन्हा एकदा सुंदर भेट मिळणार होती पुन्हा एकदा त्याचे ऋण व्यक्त करायची वेळ आली होती.

- अनिल नारनवर


No comments:

Post a Comment